Bhupendra Patel Oath : भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री, दुसऱ्यांदा CM पदाची जबाबदारी | Gujrat

Gujarat CM Bhupendra Patel Oath : गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. गुजरात विधानसभा (Gujrat Election) निवडणुकीत भाजपनं (Gujrat BJP) विजय मिळवला. भाजपला 156 जागांवर दणदणीत विजय मिळवला आणि पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P. Nadda) यांच्यासह देशभरातील महत्वाचे नेते उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हेही या सोहळ्याला उपस्थित होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola