Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप

Continues below advertisement

Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप 

Ashok Kharat and Jayant Patil: जयंत पाटील हे आपल्या मुलाला घेऊन भोंदूबाबा अशोक खरात याच्या ईशान्येश्वर मंदिरता गेले होते. यासंदर्भात जयंत पाटील यांची चौकशी झाली पाहिजे. अशोक खरात (Ashok Kharat) हा एकदा सांगलीतील ईश्वरपूर येथेही गेला होता. त्यावेळी राजकीय करिअर चांगले करण्यासाठी अशोक खरात याने जयंत पाटील (Jayant Patil) यांना रक्ताने आंघोळ घातली होती, असा सनसनाटी दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Nashik crime news)

सार्वजनिक कार्यक्रमातील फोटोला महत्त्व नाही. नेते मंडळी गेले तर काही नाही. मात्र, मठात जाणं, मंदिरात जाणं, पूजा पद्धतीचा अवलंब करणं हे घातक आहे. जयंत पाटील यासंदर्भात सखोल चौकशी व्हावी. जयंत पाटील यांना माणसाच्या रक्ताने आंघोळ घालण्यात आली की नाही, हे समोर आले पाहिजे. खरात याने नरबळी दिल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे जयंत पाटील यांना ज्या रक्ताने आंघोळ घालण्यात आली ते रक्त कोणाचे होते, ह समोर आले पाहिजे. जयंत पाटील हे स्वत:ला पुरोगामी नेते म्हणवतात. दे देवधर्म मानत नाहीत. मग ते अशोक खरातकडे कशासाठी गेले होते, असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला. 

महिला अत्याचारावर जयंत पाटील यांची काय भूमिका आहे? हे पण तपासायला पाहिजे. गर्भवती महिलांवर अत्याचार करणारा यांचा गुरू आहे. खरात जयंत पाटील यांच्याकडे पूजा घालतो, हे सगळ्या ईश्वरपूरला माहिती आहे.  जयंत पाटील यांचा खरा चेहरा समोर आला पाहिजे. अशोक खरात याच्यासाठी 40 किलोमीटरची पाण्याची पाईपलाईन का दिली? यात जयंत पाटील यांचा मोठा सहभाग दिसतो, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola