Sunetra Pawar Janta Darbar : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचा आज बारामतीत पहिला जनता दरबार
बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) आज पहिल्यांदाच बारामतीत जनता दरबार घेत आहेत. सुरुवातीला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांची बैठक घेतील. त्यानंतर जनता दरबार घेणार आहेत. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार (DCM Sunetra Pawar) यांच्या बारामतीतील पहिल्याच जनता दरबाराला लोकांची गर्दी जमली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यानंतर आता सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांनी कामाला, बैठकांना सुरूवात केली आहे. आज त्या बारामतीत आहेत, आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांची बैठक होत आहे, त्याचबरोबर जनता दरबार देखील होत आहे.
अजित पवारांच्या पावलावर पाऊल टाकत सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील सहयोग यांनी निवासस्थानी जनता दरबार घेतला. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचंही पाहायला मिळालं आहे.(DCM Sunetra Pawar)
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुनेत्रा पवार होणार?
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुनेत्रा पवार होणार का? अशा चर्चा सुरू आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी अजित पवार होते. ब वर्ग गटातून ते निवडून आले होते त्यांच्या जाण्याने ती जागा रिक्त झाली आहे. ब वर्ग गटातून सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे.
अजितदादा विविध संस्थेत मोठ्या पदांवर होते, आता पार्थ-जय पवारांवर जबाबदारी
अजित पवार हे अनेक सहकारी संस्था आणि साखर कारखान्यांवर संचालक किंवा अध्यक्ष पदावर होते. या पदांबाबत आता पवार कुटुंबीयांकडून महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. बारामती (Baramati) येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये बुधवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. याठिकाणी शरद पवार (Sharad Pawar) आणि पार्थ पवारांचे चिरंजीव जय पवार, पार्थ पवार (Parth Pawar) हे उपस्थित होते. यावेळी अजित पवार अजित पवार अध्यक्ष आणि संचालक असलेल्या संस्थांमध्ये त्यांच्या जागेवर पवार कुटुंबातील सदस्यांची वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाले. (Baramati news)
























