Devendra Fadnavis Mumbai : विरोधक फक्त माध्यमात दिसतात, जनतेत नाही, विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Devendra Fadnavis Mumbai : विरोधक फक्त माध्यमात दिसतात, जनतेत नाही, विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया 
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीचे निकाल हाती येत आहेत  काऊंटिंगचा शेवटचा टप्पा सुरु आहे, कल लक्षात घेता राज्यातील जनतेने पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला आहे १२ जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थापित झालेला दिसतो आहे  १२ ही ठिकाणी महायुती असेल हे स्पष्ट झालंय  ७ ठिकाणी भाजप नंबर एकवर , शिवसेना २ ठिकाणी, राष्ट्रवादी कांग्रेस पुण्यात १ नंबरवर आहे, आणि तिन्ही एकत्र लढलो त्यात कोल्हापूर लातूर महायुती १ क्रमांकावर आहे  भाजपसाठी २०१७ चा रेकाॅर्ड जिल्हा परिषदेचा तोडला आहे  घोषित निकालात २३६ जागा भाजपला मिळाला आहे  पंचायत समितीचा विचार केला त्यात घोषित जागांमध्ये २०१७ साली २८४ जागा होत्या  आत्ता ४१० जागा भाजपचा मिळाल्या आहेत  मोठी उडी भाजपने मारली आहे आणि मित्र पक्षांना देखील चांगल्या जागा मिळाल्या आहेत  ५० पंचायत समिती भाजप, २६ शिवसेना, २० राष्ट्रवादी, ५ ठाकरेंकडे असणार आहे महायुतीला १०० च्या वर पंचायत समिती जिंकता आल्या आहेत निवडणुका दरम्यान अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याचे दुःख आहे  मी एक आवाहानाचा व्हीडिओ केला होता  ग्रामीण मानसिकता पूर्णपणे समोर आली आहे  सगळ्या निवडणुकांत राज्याने केलेले काम आहे त्यावर शिक्कामोर्तब केले आहे  सहकारी पक्षाचे अभिनंदन करतो, भाजपचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात चांगले यश मिळाले  राज्यातील जनतेचे आभार मानतो  आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करु असे आश्वासन देतो २०१७ साली ग्रामीण भागात मुसंडी आम्ही मारली होती  यावेळी त्यापेक्षा मोठा विजय आहे  २०१४ साली मिथक होतं शहरी पक्ष होतं ते मोडून काढलं आहे  शहर निमशहर आणि ग्रामीण असा आमचा पक्ष आहे  जनतेचा विश्वास आहे, मोदीजी यांनी ज्या प्रकारे ग्रामीण विकासाचे कार्य हाती घेतले निधी उपलब्ध झाला  आवाज योजना, लखपती दीदी यातून सकारात्मक वातावरण तयार झालं  राज्य सरकारनं देखील जे कार्य करुन दाखवलं यातून विश्वास तयार झाला  मोठं समर्थन आम्हाला मिळतं आहे  आॅन विरोधक चिंतन करावं लागेल असं म्हणत असेल तर ते योग्य मार्गावर आहे  कोणावर तरी खापर फोडतात ते कधीही जिंकू शकत नाही  महाविकास आघाडी कुठेही दिसत नाही आहे  आम्हाला फार करण्याची काही गरज नाही  त्यांचे प्रवक्ते सकाळी ९ वाजता बोलतात त्यातून आम्हाला फायदा होतो  त्यांचे विधानं असतात, ज्याला सत्यता नसते यातून आमचं काम सोपं होतं मूळात विरोधकात लढण्याची इच्छाशक्ती पाहिजे त्याचा अभाव दिसतो  जनतेत जात आपल्याला आवाज बनावा लागतो विरोधक फक्त माध्यमात दिसतो, जनतेत दिसत नाही  आॅन भाषा अहवाल समितीनं आज रिपोर्ट दिला आहे  मंत्रिमंडळासमोर तो ठेवण्यात येईल  विविध शिफारसींवर आम्ही चर्चा करु  काही माॅडिफाय करायचे आहे का? स्विकारायचा का? कसा घ्यायचा? यासंदर्भात चर्चा होऊन निर्णय होईल  आॅन सरसंघचालक सरसंघचालक बोलतात ते दिशादर्शक असतं  आमच्याकडे त्यावर मतं ठेवणं हे उचित नाही आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola