Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

Continues below advertisement

Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

सीबीएसई परीक्षेमध्ये झालेल्या कथित गोंधळावरून राहुल गांधी आणि भाजप नेत्यांमध्ये 'एक्स वॉर' रंगलंय... सीबीएसईनं यंदा घेतलेल्या १२वीच्या परीक्षेत ओएसएम प्रक्रियेत गोंधळ झाल्याचा राहुल गांधींचा आरोप आहे... आणि उत्तर पत्रिकांच्या मूल्यांकनासाठी सरकारनं निवडलेल्या 'कोएम्प्ट' कंपनीकडे बोट दाखवत... राहुल यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केलीये... राहुल गांधींनी गुरुवारी केलेल्या या एक्स पोस्टवर प्रधान यांनी सडकून टीका केलीये... एबीपी नेटवर्कला दिलेल्या विशेष मुलाखतीत राहुल गांधींचं मानसिक संतुलन ढळल्याचा आरोप शिक्षणमंत्र्यांनी केला... तसंच दोन काँग्रेसशासित राज्यांमध्ये याच कंपनीला कंत्राटं दिलेली असल्याचा दावाही केला...त्यामुळे आता राहुल विरुद्ध भाजप असं सोशल मीडिया युद्ध रंगल्याचं बघायला मिळतंय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola