Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?

Continues below advertisement

Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?

शेवटच्या काळात अजितदादा खूप व्यक्त व्हायचे, त्यावेळी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याबाबत दादा नकारात्मक पद्धतीने व्यक्त व्हायचे असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला. त्याचवेळी तटकरे आणि पटेलांची एक ऑडिओ क्लिप सुनेत्राकाकी आणि पार्थ पवारांनी ऐकली. वेळ आल्यानंतर ती ऑडिओ क्लिप आम्ही बाहेर काढू असा दावाही रोहित पवारांनी केला. एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात रोहित पवार बोलत होते. यावेळी बारामतीचे पुढचे दादा कोण या मुद्द्यांसह रोहित पवारांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलं.दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सातत्याने चर्चेत आहेत. दादांच्या अपघाताबाबत त्यांनी वारंवार शंका उपस्थित केल्या असून त्यासाठी त्यांनी अनेक पत्रकार परिषदाही घेतल्या आहेत. त्यासोबच त्यांनी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंनाही टार्गेट केलं.रोहित पवार म्हणाले की, "पटेल आणि तटकरे हे गेल्या 22 वर्षांपासून पक्षात आहेत. त्यावेळी पटेल आणि तटकरेंना पवार साहेबांनी सांभाळून घेतलं. प्रफुल पटेल यांच्यावर ईडीची कारवाई सुरू झाली, तटकरेंवरही पोलीस केस सुरू झाली. त्यावेळीही पटेल यांच्यासोबत दादांचं तितकंसं चांगलं नव्हतं. शेवटच्या चार महिन्यांमध्ये मी दादांसोबत काम केलं. त्यावेळी दादा वेगवेगळ्या मुद्द्यांवर व्यक्त व्हायचे. त्यातल्या त्यात पटेल आणि तटकरे यांच्याबद्दल दादा जास्तच नकारात्मक पद्धतीने व्यक्त झाले होते."रोहित पवार पुढे म्हणाले की, "राष्ट्रवादीचे निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं पत्र समोर यायच्या आधी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचा एक ऑडिओ पार्थ आणि सुनेत्राकाकींनी ऐकला. त्यामध्ये त्यांनी दादांबद्दल नकारात्मक पद्धतीने चर्चा केली होती. तो ऑडिओ कुणाकडे आहे ते माहिती आहे, गरज पडल्यास तो आम्ही बाहेर आणू शकतो."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola