BMC Election 2026 Ravikiran Deshmukh :ठाकरे vs फडणवीस?मुंबईत कुणाचं पारडं जड?पालिकेचं सोपं विश्लेषण

BMC Election 2026: मुंबईत ठाकरेंचं पारडं जड की महायुतीच? BMC च्या निवडणुकीआधी राजकीय विश्लेषकांनी सगळं सांगितलं!

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा (BMC Election 2026) काल प्रचार थंडावला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वंच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला होता. आता उद्या म्हणजेच 15 जानेवारीला मुंबई महानगरपालिकेसाठी निवडणुका होणार आहे. तर 16 जानेवारीला निकाला जाहीर होईल. त्याआधी मुंबईत ठाकरे बंधू की शिंदे-फडणवीस?, मुंबईत कोणाचं पारडं जड आहे?, याबाबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख यांनी विश्लेषण मांडलं आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या वैशिष्य म्हणजे 2017 सालच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना हे सरकारमध्ये एकत्र होते. शिवसेना एकसंघ होती. त्यावेळी भाजप आणि शिवसेना स्वतंत्र्यपणे लढले. भाजपचा भर ठाकरेंची राजवट कशी असते, त्यांची वैशिष्ट काय?, महापालिकेत शिवसेनेने काय केलं?, यावर प्रचार झाला. 2017 च्या महापालिकांच्या निवडणुकांच्या प्रचारात एक मर्यादा होती. कारण सरकारमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होती. 2026 च्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारात शिवसेना ठाकरे गटाकडून मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठीचं काय होईल?, यावर प्रचार केला. तर भाजपकडून आधी हिंदू-मराठी, मग मुंबईचा महापौर खान होईल, असा प्रचार सुरु केला.  पण शेवटी मराठीच्या मुद्यावरचं आलं. काँग्रेसने बहुभाषिक मतदान आहे. परप्रांतीय आहेत. पण काँग्रेसनेही बाहेरील लोकांची बाजू आक्रमकपणे मांडली नाही. कारण त्यांच्याही लक्षात आलं की बहुतेक मुंबईमध्ये मतांचे ध्रुवीकरण होतंय. हे या प्रचाराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य ठरलं.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola