Nitish Kumar | नितीश कुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार; NDA च्या बैठकीत काय झालं?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Nov 2020 05:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांची एनडीएचे विधीमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. हा निर्णय एनडीच्या विधायक दलाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. आज संध्याकाळी नितीश कुमार राज्यपालांकडे बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्याचा दावा करू शकतात. तसेच उद्या सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.