Bhaskar Jadhav on Ramdas Kadam : गाढवाला गुळाची चव काय? रामदास कदमांच्या डोक्यावर परिणाम
Bhaskar Jadhav on Ramdas Kadam : गाढवाला गुळाची चव काय? रामदास कदमांच्या डोक्यावर परिणाम
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रामदास कदम यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. रामदास कुठेही गेले तरी दुसऱ्याच्या नावाने शिव्या देतो. गाढवाला गुळाची चव काय? अशी रामदास कदमांची स्थिती आहे, रामदास कदम यांनी चांगली चरित्र वाचावी असे जाधव म्हणाले.रामदास कदम याला मी एकेरीच बोलणार असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. माझा मुलगा कष्ट करून मोठा झाला आहे. तुम्ही हप्तेखोर, हप्ते खाता, असे म्हणत भास्कर जाधव यांनी रामदास कदमांवर हल्लाबोल केला. मुंबईतील बार चा उल्लेख करतजाधवांनी पुन्हा टीका केली. रामदास कदम हा माणूस आहे की कोण हेच कळत नाही. रामदास कदम ही विकृती असल्याचे जाधव म्हणाले. खेडमधील सभेत भास्कर जाधव यांनी रामदास कदमांवर जोरदार टीका केली.























