Ashok Kharat Nashik office:स्पॉटलाईट,भिंतीवर मेसेज,ज्या टेबलवर अत्याचार,तिथे SIT गेली,काय सापडलं?
Ashok Kharat Nashik office:स्पॉटलाईट,भिंतीवर मेसेज,ज्या टेबलवर अत्याचार,तिथे SIT गेली,काय सापडलं?
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरात (Ashok Kharat) याला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून कसून चौकशी (SIT Investigation Ashok Kharat Office) सुरु आहे. अशोक खरात प्रकरणी पुन्हा एकदा तपासाला वेग आला आहे. एसआयटीचे पथक आज पुन्हा नाशिकमधील अशोक खरातच्या फोकस प्रॉपर्टी या कार्यालयात येऊन धडकलं. यावेळी पोलीस काही फिर्यादींना दाखल झाले होते. अशोक खरात याच्या काळ्या कारनामे चौकशी सुरू असून ओकस प्रॉपर्टी इथले कार्यालय उघडून आज पुन्हा तपासणी करण्यात आली. तसेच महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून अशोक खरातच्या कार्यालयाची मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आली. (Ashok Kharat Office SIT Team)
एसआयटीला अशोक खरातच्या ऑफिसमध्ये काय काय दिसलं? (SIT Investigation Ashok Kharat Office)
अशोक खरात ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचार करायचा त्या कार्यलयात आज एसआयटीचं पथक आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली होती. त्याच्या कार्यलयात ज्या भागात महिलांच्या कुटुंबीयांना बाहेर बसवुन तो अत्याचार करायचा. त्या केबिनमध्ये छोटे स्पॉट लाईट आहेत.(फोकस लाईट) मागच्या भिंतीवर "ओम"आहे. त्यामाध्यमातून अध्यात्मिक असल्याचे भासवून प्रभाव टाकला जात होता. तर बाहेरच्या बाजूला भारताचा राष्ट्ध्वज भिंतीवर लावला आहे. जिथे पिढीत महिलांचे कुटुंबीय बसायचे तिथे तिरंगा लावण्यात आला आहे.