Anandache Paan :आनंदाचे पान : 'गोष्ट पैशापाण्याची' पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांच्याशी खास चर्चा
Continues below advertisement
भाषा, व्याकरण, साहित्य व इतिहास असा चौफेर संचार करणाऱ्या इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांनी ग्रंथांना समाजसुख असे म्हटले आहे. समाजसुख या शब्दप्रयोगाचे स्पष्टीकरण करतांना राजवाडे म्हणतात, ‘ग्रंथ वाचल्याने मनुष्य विचार करू लागतो. विचारांचा खल झाल्यावर आचार बनतात व नंतर समाजाचे पाऊल पुढे पडते.’ तर असा विचारांचा खल करायला लावणाऱ्या एका लोकप्रिय पुस्तकाबद्दल आपण आज गप्पा मारणार आहोत.. खरं तर लोकप्रियतेचे सगळे रकॉर्ड मोडणारं असं हे पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे गोष्ट पैशापाण्याची – लेखक प्रफुल वानखेडे यांचं हे पुस्तक सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलंय.. प्रफुल वानखेडे हे खरं तर उद्योजक आहेत, पण उत्तम वाचक आहेत आणि वाचनसंस्कृतीसाठी काम कराणारे असे वाचनप्रेमी आहेत. त्यांचं हे पुस्तक नक्की कशाबद्दल आहे, हे लेखक प्रफुल्ल वानखेडें यांच्याकडून जाणून घेऊया
Continues below advertisement