Aloka Mahapalika : भाजप तेजीत, आंबेडकर वंचित; अकोला महापालिकेत सत्तासंघर्ष कसा संपला? Special Report

Continues below advertisement

Aloka Mahapalika : भाजप तेजीत, आंबेडकर वंचित; अकोला महापालिकेत सत्तासंघर्ष कसा संपला? Special Report

महापालिका निवडणुकीनंतर राज्यातल्या अनेक महापालिकांमध्ये सत्तास्थापनेवरुन संघर्ष पेटला. यापैकीच एक होती विदर्भातली अकोला महापालिका. इथे भाजप ३८ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र तरीही ४४ ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी त्यांना बरीच कसरत करावी लागली. त्यात काँग्रेस, वंचित आणि ठाकरेंच्या शिवसेनेनंही सत्तास्थापनेसाठी तयारी चालवली होती. मात्र अखेर भाजपनंच बाजी मारत हा संघर्ष संपवला. मित्रपक्षांच्या साथीनं अकोला महापालिकेत भाजपनं सत्तास्थापनेचं सोपान कसं गाठलं? कुणाचंही बहुमत नसलेल्या अकोला महापालिकेत निकालानंतर भाजप आणि काँग्रेसच्या नेतृत्वात दोन्ही आघाड्यांना सत्तेचे समान संधी होतीय. यासाठी अनेक बैठका, आघाड्या आणि डिनर डिप्लोमॅसी'ही झाल्यात. मात्र, आधी भाजपच्या हातातून बाजी गेल्याचं वाटत असतानाच भाजपाने अकोला महापालिकेत परत आपली सत्ता स्थापन केलीये.‌ या सर्व सत्तेच्या खेळात भाजपाचे आमदार आणि विधानसभेतील मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांच्या राजकीय खेळ्या विरोधकांवर भारी पडल्यात. त्यामुळे अकोला महापालिकेच्या राजकारणात भाजपचे रणधीर सावरकर हेच खरे 'धुरंधर ठरल्याचं या सर्व घडामोडींनी शिक्कामोर्तब केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola