Special Report Mumbra Sahar Shaikh : 'कैसा हराया..', विजयाचा गुलाल, मुंब्रा करणार हिरवा?
Special Report Mumbra Sahar Shaikh : 'कैसा हराया..', विजयाचा गुलाल, मुंब्रा करणार हिरवा?
महापालिका निवडणुकीत निवडून आल्यानंतर तिनं अख्खा मुंब्रा हिरवा करण्याचा विडा उचललाय...तिचं नाव आहे सहर शेख...शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्र्यात तिनं धूळ चारलीय...आणि त्यानंतर केलेल्या भाषणामुळे ती कमालीची चर्चेत आहे...पाहुयात आव्हाडांशी पंगा घेणाऱ्या सहर शेखचा स्पेशल रिपोर्ट...सहर शेख नावाच्या या मुलीनं गेल्या तीन दिवसांपासून सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म आणि टीव्हीचा पडदा गाजवलाय...नगरसेवकपदी निवडून येणं हेच केवळ तिचं यश नाही...तर ज्या परिस्थितीत तिनं लढाई जिंकली, त्याची चर्चा मोठी आहे...कैसा हराया हे सहरचे दोनच शब्द म्हणजे तोफांचे गोळे ठरलेत...याच तोफांनी जितेंद्र आव्हाडांसारख्या मातब्बराच्या बालेकिल्ल्याच्या ठिकऱ्या उडवल्यात...आव्हाडांच्या नाकावर टिच्चून ठाण्यातल्या मुंब्र्यात एमआयएमचे पाच नगरसेवक निवडून आलेत...त्यात सहर शेख आणि तिचे वडील युनूस शेख यांचा सिंहाचा वाटा आहे...फसवणुकीची भावना झाल्यानं या बाप लेकींनी जे करून दाखवलं त्याची राज्यभरात चर्चा आहे...आव्हाडांना धडा शिकवायचाच या त्वेषानं बापलेक मैदानात उतरले...आणि आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला...तिच्या या वक्तव्यानं वाद पेटल्यानंतर तिनं यामागचा तर्क समजावून सांगितला...आणि आपल्या धर्मनिरपेक्षताचा पुरावाही सादर केला...विरोधकांनी निवडून आल्याबद्दल सहरला शुभेच्छा दिल्यात...पण वादग्रस्त वक्तव्यं टाळण्याचा सल्लाही दिलाय...दुसरीकडे आव्हाडांनी फसवल्याचा आरोप करत युनूस शेख यांनी टोकाचा पण केलाय...सहरच्या राजकीय करिअरची आता सुरुवात झालीय...राजकारणात उतरण्याआधी आयएएसची तयारी करणाऱ्या सहरनं आता सनदी अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केलाय...मेहनती आणि जिद्दी असल्याचं सहरनं दाखवून दिलंय...राजकारणात बदल्याची भाषा होत असते...पण सहर आता जनतेच्या प्रश्नांसाठी हाच तडफदारपणा दाखवावा, यासाठी तिला शुभेच्छा...