Navi Mumbai airport first flight : नवी मुंबई विमानतळ सेवेत, पहिलं विमान हवेत Special Report

Navi Mumbai airport first flight : नवी मुंबई विमानतळ सेवेत, पहिलं विमान हवेत Special Report

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अखेर आज प्रवासी विमान वाहतूक सुरु झाली. आधुनिक सोईसुविधांनी सुसज्ज असलेल्या या विमानतळाची तुलना लंडनच्या हिथ्रो विमानतळाशी केली जाते. या विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील ताण कमी होणार आहे. त्यासोबतच नवी मुंबई आणि आसपासच्या भागात रोजगाराच्या संधीसह आर्थिक विकासालाही मोठा हातभार लागणार आहे. नवी मुंबई विमानतळ आणि त्यानिमित्तानं सुरु झालेल्या एका नव्या पर्वाचा आढावा घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून...

स्थळ - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

वेळ - सकाळी ८ वाजून २० मिनिटं....

बंगळुरूवरुन आलेलं एअर इंडियाचं हे विमान

नवी मुंबईच्या नव्या कोऱ्या विमानतळाच्या धावपट्टीवर उतरलं

आणि नवी मुंबईकरांची अनेक वर्षांची प्रक्षीक्षा अखेर संपली....

सकाळी ८ ते संध्याकाळी ८,
१२ तास विमानतळ कार्यरत

फेब्रुवारी २०२६ पासून
विमानतळ २४ तास सुरु

सध्या नवी मुंबईतून 
देशांतर्गत फेऱ्या

मार्च २०२६ पासून
आंतरराष्ट्रीय फेऱ्या सुरु 

सध्या दररोज ३०
विमानांचं टेक ऑफ
आणि लँडिंग

इंडिगो, एअर इंडिया,


अकासा एअर, स्टार एअर 


विमान कंपन्यांची सेवा सुरु

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola