Sunil Tatkare on Kharat : तुमच्यासमोर खरातने पूजा केलीय का? सुनील तटकरेंचं बेधडक उत्तर

Continues below advertisement

Sunil Tatkare on Ashok Kharat: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. बलात्काराच्या आरोपाखाली अटक झालेल्या खरातचे रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याशी असलेले कथित आध्यात्मिक संबंध समोर आल्यानंतर त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या हातावरील जखमा आणि त्यावर मलमपट्टी केलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. हे फोटो काही 'अघोरी पूजा' किंवा अंधश्रद्धेशी संबंधित असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या बोटाला नेमकी जखम कशी झाली? याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 

सुनील तटकरे म्हणाले की, मी पुन्हा, पुन्हा खुलासा करणार नाही. मी 40 वर्षांपासून राजकारणात आहे. 2019 साली मी महाविकास आघाडीमध्ये निवडून आलो. 2024 ला महायुतीकडून निवडून आलो. माझी विश्वासार्हता आहे. लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताच्या दोन दिवस आधी अलिबागला ॲड प्रवीण ठाकूर मला भेटायला आले. त्यांना भेटून मी निघालो असताना त्यांनी दरवाजा लावला, त्यावेळी माझ्या बोटाला जखम झाली होती, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच, माझी श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही, असे देखील ते म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola