Shridi Gudipadwa 2024 : साई मंदिराच्या सुवर्ण कळसावर पारंपारिक पद्धतीने गुढी उभारली,भाविकांची गर्दी
abp majha web team
Updated at:
09 Apr 2024 09:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाईबाबांच्या शिर्डीतही गुढीपाडव्याचा उत्साह दिसून येतोय. साई मंदिराच्या सुवर्ण कळसावर पारंपारिक पद्धतीने गुढी उभारण्यात आलीय. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक विधिवत पूजा करुन ही गुढी उभारली. आज साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रुपयांच्या आभूषणांसह साखरेच्या गाठ्यांची माळ परिधान करण्यात आली आहे. साईंच्या दर्शनाने नववर्षाची सुरुवात करण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली.