Girish Mahajan Republic Day Controversy : गिरीश महाजन उल्लेख विसरले, अडचणीत सापडले Special Report

Girish Mahajan Republic Day Controversy : गिरीश महाजन उल्लेख विसरले, अडचणीत सापडले Special Report

एखाद्या वक्तव्यामुळं राजकीय नेते अडचणीत आल्याचं आपण अनेकदा पाहतो. आक्षेपार्ह भाषा आणि बेताल वक्तव्यं करून नेते अनेकदा स्वतःसाठी संकटं ओढवून घेतात. पण सध्या मंत्री गिरीश महाजन चर्चेत आलेत ते त्यांनी न केलेल्या एका उल्लेखामुळे. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात गिरीश महाजनांनी डॉ. आंबेडकरांचा उल्लेख का टाळला, असा सवाल महिला वन कर्मचाऱ्यानं उपस्थित केला आणि वादाचं मोहोळ उठलं. दिलगिरी व्यक्त करून हा वाद शांत करण्याचा प्रयत्न गिरीश महाजनांनी केला. मात्र अद्याप वादाचं हे वादळ शांत होत नसल्याचं चित्र आहे. पाहूया, याचाच आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट.

२६ जानेवारी १९५० या दिवसापासून भारतात राज्यघटनेची अंमलबजावणी सुरु झाली.याच ऐतिहासिक घटनेचा अभिमान व्यक्त करण्यासाठी दर वर्षी देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकरांचा उल्लेख न झाल्यावरून महाराष्ट्रात वाद उभा राहिलाय. गिरीश महाजनांनी चूक मान्य केल्यानंतर हा वाद आता शांत होणार की दिलगिरी व्यक्त करणाऱ्या गिरीश महाजनांना माफीदेखील मागावी लागणार, हे लवकरच कळेल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola