Chhagan Bhujbal Angry : नाशिकमधील वाहतूक कोंडीवरून छगन भुजबळ अधिकाऱ्यांवर भडकले
Chhagan Bhujbal Angry : नाशिकमधील वाहतूक कोंडीवरून छगन भुजबळ अधिकाऱ्यांवर भडकले
Chhagan Bhujbal : नाशिक (Nashik) शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या (Traffic jam) पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शनिवारी द्वारका चौक (Dwarka Chowk) परिसरातील सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी महापालिका, वाहतूक पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या अधिकाऱ्यांना खरमरीत शब्दांत सुनावल्याचे दिसून आले.
द्वारका चौकात हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. याअंतर्गत तेथील गोल चौक (सर्कल) हटविण्यात येत आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी हे द्वारका चौक परिसरात दाखल झाले होते. या कामाची पाहणी करत असताना भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना फटकारले.
छगन भुजबळ यांनी मुंबई नाका ते द्वारका परिसरात उड्डाण पुलाखाली भिक्षेकरी ठाण मांडून असतात, सर्व्हिस रोडवर अतिक्रमण आहेत. याबाबत विचारणा केली असता मनपाच्या अधिकाऱ्यांनी हे आमचे काम नाही, असे उत्तर दिले. मनपा अधिकाऱ्यांच्या उत्तरानंतर छगन भुजबळ चांगलेच संतापले.
छगन भुजबळांचा इशारा
“मी मुंबई महापालिका सांभाळली आहे, कोणाचे काय काम हे मला चांगले माहीत आहे. अधिकारी काम करत नसतील तर मी स्वतः रस्त्यावर उतरतो,” असा थेट इशारा भुजबळ यांनी दिला. सध्याचे अधिकारी खूप बिझी झालेत. मानस हॉटेलमध्ये जायला वेळ आहे, पण येथे पाहणीसाठी येण्यासाठी वेळ नाही, असे म्हणत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावाले.