Nashik Toll Naka Controversy : शिंदे टोल नाक्यावरील 'टोल'धाडीला चाप, कंपनीला 2 कोटी 18 लाखांचा दंड
Continues below advertisement
रस्त्याचं काम पूर्ण न करता टोलवसुली करणं टोल कंपनीला महाग पडलं आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोलनाक्याला तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अर्धवट रस्त्यामुळे या ठिकाणी वाहतुक कोंडी होते आणि अपघाताचे प्रमाणही वाढले. उडणाऱ्या धुळीमुळे आजूबाजूच्या नागरिक व्यावसायिकांना त्रास होतो. याबाबत वारंवार विनंती, सूचना करुनही रस्त्याचं काम पूर्ण होत नव्हते. अखेर शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी राष्ट्रीय प्राधिकरणाकडे तक्रार केली. यानंतर टोलवसुली करणाऱ्या चेतक प्रा.लिमिटेड कंपनीला 2 कोटी 18 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. या ठिकाणी अपघातांमध्ये काही नागरिकांचा मृत्यू झाल्यानं कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होते आहे. तसंच रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली बंद करण्याची मागणीही होते.
Continues below advertisement