Ashok Kharat School : शालेय जीवनात अशोक खरातची 'कोंबडीचोर' म्हणून ओळख
स्वतःला अंकशास्त्राचा ज्योतिषी म्हणवणारा अशोक खरात खरं तर गणित विषयांत २८ गुण मिळाल्याने नापास झाला होता. तर वावी गावातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत तो शिकत असताना त्याच्या उद्योगांमुळे त्याला कोंबडीचोर म्हणून ओळखलं जात होतं. त्यानंतर भोंदू अशोक खरात मर्चंट नेव्हीत हमाली करायला गेला असता स्वतःला कॅप्टन म्हणवून घ्यायला सुरुवात केली. मात्र त्याच खरं रुप उघड झालं आणि सर्वांनाच त्याची किळस वाटायला लागली. तो ज्या शाळेत शिकला तिथं आत्ता शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी खरातच्या या उद्योगांमुळे आमची शाळा नाहक बदनाम झाल्याच म्हटलंय. तर त्याला या परिसरात कोंबडीचोर म्हणून ओळखलं जातं असताना देखील एवढे मोठ मोठे नेते त्याला कसे भुलत गेले याबद्दल ही आश्चर्य व्यक्त केलंय. सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारावा अशी अपेक्षा या शाळेतील विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेलीय...