Sudhir Mungantiwar Nagpur : मी कधीच नाराज नव्हतो,हा पक्ष माझा आहे - सुधीर मुनगंटीवार
Sudhir Mungantiwar Nagpur : मी कधीच नाराज नव्हतो,हा पक्ष माझा आहे - सुधीर मुनगंटीवार
चंद्रपुरात ज्यांना आधी प्रमुख म्हटलं होतं ते माझ्यामते केवळ घुग्घुससंदर्भात होतं
जोरगेवारांच्या हकालपट्टीसंदर्भात मला काही माहिती नाही
जनतेचं हृदय जिंकणं हे आमचं काम आहे..
डायलॉगचा अभाव
On नागपुरात भाजप बैठक
* फक्त चंद्रपूर नाही, तर नागपूर विभागातील चारही (नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती) महापालिका बद्दल आज बैठक आहे.. त्यासाठी त्या त्या महापालिकातील प्रमुख आणि प्रभारी यांच्याशी चर्चा होईल.. चंद्रपूर चे प्रभारी चैनसुख संचेती आणि अशोक नेते तसेच आम्ही काही प्रमुख नेते अशी आजची बैठक होईल..
On प्रभारी बदलले
* अगोदर ज्यांना (किशोर जोरगेवार) चंद्रपुरात ज्यांना प्रमुख म्हटले होते.. त्यांना फक्त घुग्गुस नगर परिषदेचे अनुषंगाने प्रभारी बोलण्यात आले होते...
* माझ्यापर्यंत ते (किशोर जोरदार) प्रभारी आहेत अशी माहिती नव्हती.. मला उपेंद्र कोठेकर यांच्याकडून आज जे सांगण्यात आले आहे, की चैनसुख संचेती ज्यांनी मुलाखती घेतल्या, आणि अशोक नेते हे आजच्या बैठकीत उपस्थित राहतील..
* ( किशोर जोरगेवार कधी प्रभारी नव्हते का??) मला त्याबद्दल माहिती नाही..
On Cm मीटिंग
* मी पक्षाचा अध्यक्ष राहिलो आहे, महामंत्री राहिलो आहे, पक्षाने मला भरभरून दिले आहे, म्हणून मला नेहमी वाटते पक्षाचे चांगले व्हावे.. "मै रहू ना रहू भारत यह रहना चाहिए" अशा स्वरूपात आम्ही काम करतो.. निवडणूक जिंकणं हे आमचे बाय प्रॉडक्ट आहे.. जनतेचे हृदय जिंकणे हे आमची मुख्य काम आहे, "मैं रहू ना रहू भारत यह रहना चाहिये" अशा स्वरूपात आम्ही काम करतो.. यासंदर्भात अडचण वाटली तर ती चर्चेतून लक्षात आणून देणे हे महत्त्वाचे आहे..
On चंद्रपूर घडामोड
* कार्यकर्त्यांमध्ये कधीच डायलॉगचा अभाव नव्हता.. कार्यकर्ते पक्षाचा आत्मा आहे.. त्यांच्या विना पक्ष अपूर्ण आहे.. त्यांच्यामुळेच आम्ही विजयाची उंच उडी घेतो.. कुठेतरी नेत्यांमध्ये डायलॉगचा अभाव असेल, तर ते दूर करणे पक्षाची जबाबदारी आहे, पक्ष त्या अनुषंगाने काम करेल...
On शक्ती मिळाली का
* मी जी शक्ती म्हणालो त्याचा तुम्ही विपर्यास केला.. शक्ती याचा अर्थ म्हणजे जे जे वाईट आहे ते दूर केले पाहिजे... हे मी आज नाही तर प्रदेश अध्यक्ष असताना च्या काळापासून बोलत आहे..
* कुठे कमतरता असेल, तर ती संवादातून दूर केली पाहिजे..
On self नाराजी
* मी नाराज कधीच नव्हतो.. हा पक्ष माझा आहे.. हा घर मोठा करण्यासाठी आम्ही रक्त आटवला आहे, मग मी नाराज कसं होईल फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी हा घर आमचा आहे असे बोलू नये...
* समन्वय बैठकीत निमंत्रण असेल, तर सर्व एकत्रित येतील. मात्र ते जोरगेवार केव्हा येत आहे, हे मला माहिती नाही.. आजची बैठक महापालिका निवडणुकीसाठी तिकीट वाटपाचा निर्णय घेण्याची आहे...
On अटलजी
* अटल बिहारी वाजपेयी यांचा मूळ तत्व आजही कायम आहे... "टूटे मन से कोई खडा नही होता"..