Nagpur : गंगा जमुना वस्तीत देहविक्रीचा व्यवसाय नाही, वस्तीचा मोठा भाग सार्वजनिक परिसर
रजत वशिष्ठ, एबीपी माझा
Updated at:
26 Oct 2021 01:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरात वारंगणांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगा जमुना वस्तीत आता देहविक्रीचा व्यवसाय चालू शकणार नाही. पोलीस आयुक्तांनी आता या वस्तीचा मोठा भाग "सार्वजनिक परिसर" म्हणून जाहीर केला असून पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यासंदर्भातले आदेश ही काढले आहेत. भारतात देहविक्रीच्या व्यवसायावर कायदेशीर निर्बंध नाहीत मात्र सार्वजनिक परिसरात असे व्यवसाय करण्यावर कायदेशीर बंदी आहे. गंगा जमुना या वस्तीच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणावर शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय, मंदिर व इतर धार्मिक स्थळे आहेत.