Nagpur Road ABP Majha Impact : एबीपी माझा'च्या बातमीनंतर नागपूर रस्त्यासाठी सरकारकडून 80 कोटींचा निधी मंजूर
Nagpur Road ABP Majha Impact : एबीपी माझा'च्या बातमीनंतर नागपूर रस्त्यासाठी सरकारकडून 80 कोटींचा निधी मंजूर
एबीपी माझाच्या बातमी नंतर नागपुरातील चांपा ते खापरी या 12 किमी लांब रस्त्यावर वसलेल्या गावांना तब्बल 80 कोटींचा गिफ्ट मिळाले आहे.. होय, नागपूर जिल्ह्यातील चांपा ते खापरी या रस्त्याची परिसरातील खाणीं मधून रोज शेकडोंच्या संख्येने चालणाऱ्या अवजड ट्रकमुळे दुर्दशा झाल्याची बातमी एबीपी माझाने 11 जून आणि 17 जून रोजी दाखविली होती.. या रस्त्यावरील खड्ड्यामुळे होणाऱ्या दुर्घटना, खराब कच्च्या रस्त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे लोकांचा आरोग्य आणि शेजारील शेतामधील पिकांचा होणारा नुकसानाचे कटू वास्तव एबीपी माझा ने दाखवले होते... वाईट रस्त्यामुळे परिवहन विभागाने त्याभागात एसटीचा प्रवास थांबवल्यामुळे अनेक गावांमधील शेकडो महिलांना कसे पायी प्रवास करावे लागते, कसं धोका पत्करून खाणीच्या ट्रकमध्ये ट्रकचालकांसोबत बसून प्रवास करावा लागतो हे दुर्दैवी वास्तव ही एबीपी माझा ने समोर आणले होते. एबीपी माझाची बातमी पाहून नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित रस्त्याचा काम शासन करून देईल अशी हमी दिली होती.. एबीपी माझाच्या सततच्या पाठपुराव्यानंतर नुकतच केंद्र सरकारच्या CRIF फंडातून चांपा - खापरी या 11.8 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी शासनाने तब्बल 80 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जिथे अनेक वर्ष साधा डांबराचा रस्ता नव्हता, त्या रस्त्यासाठी शासनाने सिमेंटीकरण करण्याचे मंजूर करत तब्बल 80 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यानंतर गावकऱ्यांनी प्रचंड आनंद व्यक्त करत एबीपी माझाचे आभार मानले आहे.. चांपा ते खापरी दरम्यानच्या रस्त्यावर ग्रामपंचायत सह अनेक ठिकाणी एबीपी माझा सह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानणारे फलक लावले आहे.. महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेच्या प्रश्नांकडे एबीपी माझा ने लक्ष घालून न्याय मिळवून दिल्याबद्दल माझाला धन्यवाद देणारे बॅनर त्या भागात अनेक ठिकाणी सध्या झळकत आहे.. चांपा, हळदगाव, परसोडी गावातील नागरिकांसोबत संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधींनी...