Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
सिलेंडरची बुकिंग होऊन ओटीपी जनरेट होतो.. काही दिवसांनी सबसिडी ही बँक अकाउंट मध्ये जमा होते... सिलेंडर मात्र कधीच ग्राहकाचे घरी पोहोचत नाही... नागपुरातील एलपीजी सिलेंडरच्या काळाबाजारीकडे संकेत करणारा अफलातून प्रकार...
एलपीजी सिलेंडर साठी रीतसर बुकिंग करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला नियमानुसार योग्य कालावधीनंतर एलपीजी सिलेंडर मिळावं असं एलपीजी कंपन्यांचा नियम आहे.. मात्र नागपुरात बुकिंग केल्यानंतरही काही ग्राहकांना अनेक आठवडे वाट पाहूनही एलपीजी सिलेंडर मिळत नाही.. उलट काही ग्राहकांच्या बाबतीत तर अत्यंत अफलातून प्रकार घडत आहे... ग्राहकांनी गॅस एजन्सी मध्ये बुकिंग केल्यानंतर डिलिव्हरी साठीचा ओटीपी जनरेट होतो ग्राहकाच्या मोबाईलवरही येतो... मात्र त्यानंतर गॅस सिलेंडर कधीच ग्राहकाच्या घरी पोहोचत नाही... काही दिवसांनी ग्राहकाच्या बँक अकाउंट मध्ये गॅस सिलेंडर डिलिव्हर झाल्यानंतर ची सबसिडी मात्र जमा होते.... एलपीजी सिलेंडर कुठे जातो हे मात्र ग्राहकाला कधीच कळत नाही... नागपुरात एचपी कंपनीचे ग्राहक योगेश गोमासे यांच्या संदर्भात असेच घडले आहे कंपनीच्या ॲपवर रीतसर तक्रार केल्यानंतरही कोणताही उत्तर एचपी कंपनी किंवा संबंधित गॅस एजन्सी कडून मिळालेला नाही... त्यामुळे एलपीजी सिलेंडरची गॅस एजन्सी चे कर्मचारी किंवा डिलिव्हरी बॉय मार्फत काळाबाजारी सुरू असल्याचे आरोप ग्राहकाने केले आहे... दरम्यान संबंधित गॅस एजन्सीने या संदर्भात बोलण्यास नकार दिले आहे...