Nagpur DCP Niketan Kadam:हल्लेखोरांना रोखण्यासाठी जीवाची बाजी लावणारे पोलीस अधिकारी माझावर EXCLUSIVE
Nagpur DCP Niketan Kadam:हल्लेखोरांना रोखण्यासाठी जीवाची बाजी लावणारे पोलीस अधिकारी माझावर EXCLUSIVE
नागपूर : उपराजधानी नागपूरमध्ये रात्री 8 ते 9 वाजताच्या सुमारास दोन गटांमध्ये दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. या घनटेनंतर नागपूरच्या पोलिसांनी (Police) तत्काळ आपली कुमूक मागवून व टीम तैनात करत जमावाला पांगविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. नागपूर पोलिसांच्या या प्रयत्नांना यश आले. मात्र, या घटनेत अनेक पोलीस जखमी झाले आहेत. त्यात, पोलीस उपायुक्तांना चक्क कुऱ्हाडीचा वार सोसावा लागला. कुऱ्हाडीचा वार हातावर झेलमाऱ्या निकेतन कदम यांनी नागपूरच्या हिंसाचार घटनेचा थरारक अनुभव कथन केला आहे. नागपूरमध्ये (Nagpur) झालेल्या हिंसाचाराच्या प्रचंड गदारोळात गंभीर जखमी झालेल्या दोन पोलीस उपायुक्तांनी त्यांचा कालचा थरारक अनुभव एक्स्क्लुझिवली एबीपी माझासोबत शेअर केला आहे. पोलीस उपायुक्त निकेतन कदम आणि पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेवर भाष्य करताना चित्तथरारक अनुभव कथन केला. पोलिसांनी फक्त परिस्थिती हाताळलीच नाही तर अवघ्या काही तासात नागपूर शांत करून दाखवलं याचा प्रत्यय आपल्याला याची देही याची डोळा घटना अनुभवणाऱ्या पोलिसांच्या कथनातून येतोय.
नागपूरच्या झोन फाईव्हचे उपायुक्त निकेतन कदम हे आपल्या पथकासह एका दगडफेकीतील संशयीताला शोधण्यासाठी एका अरुंद गल्लीत गेले असता, एका घरात संशयीताचा शोध घेत असताना कदम यांच्या 4 ते 5 सहकाऱ्यांना शंभर ते दीडशे लोकांच्या जमावाने घेरले होते. सर्वांच्या हातात लाठ्या, काठ्या आणि काही धारदार शस्त्र होते. आपल्या सहकाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी डोक्यावर एक हेल्मेट आणि हातात एक काठी घेऊन निकेतन कदम जमावाच्या दिशेने गेले आणि हातातल्या काठीच्या माध्यमातून बहुतांशी जमावाला त्यांनी नियंत्रितही केले. मात्र, जमावातील एका माथेफिरूने त्यांच्यावर धारदार कुऱ्हाडीने हल्ला केला आणि त्यामध्ये निकेतन कदम यांचा हात गंभीररीत्या जखमी झाली.