Nagpur Bull Attack : वंदना देवीकर यांच्यावर वळूचा हल्ला, नागपुरात खुंखार वळूची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Nagpur Bull Attack : वंदना देवीकर यांच्यावर वळूचा हल्ला, नागपुरात खुंखार वळूची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मानवी वस्त्यांमध्ये फिरणारे मोकाट प्राणी नागरिकांच्या खास करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवितासाठी किती धोकादायक ठरू शकतात, याचा एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक प्रत्यय नागपुरात आला आहे... वंदना देवीकर या 64 वर्षीय ज्येष्ठ महिलेला, त्या घरासमोर झाडू करत असताना, मोकाट वळुने 27 जानेवारी रोजी हल्ला करून गंभीर जखमी केले होते.. सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास गल्लीत फारशी वर्दळ नसताना वळूचा वंदना देवीकर यांच्यावरील हल्ला एवढा भयावह होता की त्यात वंदना देवीकर यांच्या शरीराच्या अनेक हाडं मोडल्या, छातीतल्या बरगड्या मोडल्या, मेंदूला गंभीर इजा झाली, मांडीत वळूचे शिंग रुतले... तब्बल तीन आठवडे रुग्णालयातील आयसीयू मध्ये मृत्यूशी झुंज दिल्यानंतर, तसेच मेंदूची क्लिष्ट शस्त्रक्रिया होऊन कवटीचा एक भाग कापून काढल्यानंतर ही वंदना देवीकर शुद्धीवर आलेल्या नाही.. गेले एक महिना त्यांनी डोळा उघडलेला नाही, त्या एक शब्दही बोललेल्या नाही.. कुटुंबाने लाखो रुपये खर्च करूनही वळूने केलेल्या हल्ल्यातील आंतरिक जखमा ( मेंदूला झालेली इजा ) भरून निघालेल्या नसल्यामुळे वंदना देवीकर त्यांच्या घरातच अंथरुणाला खिळून बेशुद्ध अवस्थेत आहेत.. त्यांना कुठलीही हालचाल करता येत नाही, डोळा उघडता येत नाही.. कृत्रिम ऑक्सिजन पुरवठा करून तसेच इतर आवश्यक वैद्यकीय यंत्रे घरीच लावून देवीकर कुटुंबीयांनी वंदना यांना कसं तरी जिवंत ठेवले आहे...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola