Virar Building Collapse | वाढदिवसाचा केक कापला अन्... ५ मिनिटांत संपूर्ण इमारत कोसळली
विरारमधील इमारत दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका वर्षाच्या उत्कर्षा जोयेल या चिमुकलीचा तिच्या पहिल्या वाढदिवशीच मृत्यू झाला. उत्कर्षासोबत तिची आई आरोही मित्ता यांचाही मृतदेह सापडला आहे. उत्कर्षाचे वडील ओमकार जोयेल यांचा अद्याप तपास लागलेला नाही. मंगळवारी उत्कर्षाचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला होता. केक कापून फोटो काढल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत ही दुर्घटना घडली. पत्त्यांचा बंगला कोसळावा तशी इमारत खाली कोसळली. एनडीआरएफ टीमने आई आणि मुलीचा मृतदेह बाहेर काढला आहे. ओमकार जोयेल अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेले असल्याची भीती व्यक्त होत आहे. ओमकारच्या मित्र परिवाराला त्याची चिंता लागली आहे. "वाढदिवसाचा आनंद कधी दुःखात बदलला हे समजले पण नाही," असे मित्र परिवाराने सांगितले. ओमकारचा शोध अजूनही सुरू आहे.