Mumbai:मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागानं चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट न वापरणाऱ्या प्रवाशांवर कारवाई
Continues below advertisement
मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागानं चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट न वापरणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. चारचाकी वाहनांमध्ये आजवर चालक आणि पुढच्या आसनावरच्या प्रवाशांना सीटबेल्ट अनिवार्य होता. पण ३१ ऑक्टोबरपासून मागच्या आसनावर बसलेल्या प्रवाशांनाही सीटबेल्ट अनिवार्य करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागानं पहिले १५ दिवस या नियमाबाबत जनजागृती करण्यावर भर दिला होता. पण गेल्या तीन दिवसांत सीटबेल्ट न लावण्याप्रकरणी नऊ हजार दहा प्रवाशांवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे. त्यात तीन हजार ८४२ कारचालक आणि पाच हजार १६८ प्रवाशांचा सहभाग आहे.
Continues below advertisement