Special Report | शिवसेना नगरसेवकाचा भररस्त्यात वाढदिवस साजरा, फटाक्यांची आतषबाजी करत सेलिब्रेशन
Continues below advertisement
कोरोना काळात कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार करीत असताना याला आता नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकानेच हरताळ फासला आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून तुर्भे येथील शिवसेना नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी फटाक्यांची आताषबाजी केली. तुर्भे येथे भर रस्त्यात केक कापून , फटाके उडवून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. कोरोनाचे संक्रमण जिवघेणे होत असताना अशा पध्दतीने सत्ताधारी पक्षाचा नगरसेवकच भर रस्त्यात वाढदिवस साजरा करीत असेल तर सर्वसामान्य लोकांनी काय आदर्श घ्यायचा. विशेष म्हणजे गर्दी जमवून वाढदिवस साजरा केल्या प्रकरणी पोलिसांनी नगरसेवकावर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. पोलीसांच्या या भूमिकेबाबत सर्वसामन्य लोकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
Continues below advertisement