Sanjay Raut Bail plea Hearing : संजय राऊत तुरुंगाबाहेर येणार? आज जामिनावर फैसला
जवळपास १०० दिवस तुरुंगात काढल्यानंतर ठाकरे गटाची तोफ अर्थात संजय राऊत तुरुंगाबाहेर येणार की त्यांचा कोठडीतला मुक्काम वाढणार हे आज स्पष्ट होणार आहे.. गेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं संजय राऊतांच्या जामिनावरचा निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे आजच्या फैसल्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.. पत्राचाळ प्रकरणी ईडीनं लावलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा युक्तिवाद संजय राऊतांच्या वतीनं करण्यात येतोय.. तर संजय राऊत हेच घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ईडीनं केलाय..