Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

Continues below advertisement

मुंबई पोलिसांनी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या १२ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या हत्येचा आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचा परस्पर संबंध उघड केला आहे.  या दोन्ही प्रकरणांतील आरोपींचा याआधीही गुन्हेगारी संबंध असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय. बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपी रुपेश मोहोळ आणि स्वप्नील सकट हे दोघेही २०२३ मधील पुणे पोलिसांच्या एका शस्त्रसाठा आणि मारहाणीच्या गुन्ह्यात सहभागी होते. तसंच हे दोघं फरार गँगस्टर शुभम लोणकर याच्या थेट संपर्कात असल्याचंही तपासातून समोर आलंय. दोन्ही गुन्ह्यांमागे शुभम लोणकरचाच हात असल्याचं पोलिसांच्या तपासात दिसतंय. तपासादरम्यान स्वप्नील सकटच्या घरातून पिस्तूल, तीन मॅगझिन आणि एअरगन जप्त करण्यात आले. ही शस्त्रे पुण्यातील आसाराम फासले उर्फ बाबू याने पुरवल्याचं निष्पन्न झालं. त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र फासले याने ३ शस्त्र पुरवली असताना पोलिसांना मात्र आतापर्यंत एकच शस्त्र मिळालंय. उर्वरित दोन शस्त्राचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणातील आरोपींची संख्या पाच झाली असून सर्वांना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola