Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेतविसरु नका, UNCUT Speech
Raj Thackeray and Chandrakant Patil: सध्याच्या काळात नव्या जेन झी पिढीला अपेक्षित असणार्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. त्यासाठी जुन्या भ्रामक कल्पना सोडून दिल्या पाहिजेत. आमच्या काळात आई सांगायची की, 'डोक्याला रात्री तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते.' पण एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपड चोपड चोपडलं, पण त्याला बुद्धी आली नाही. या माणसाचा प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो. अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना लक्ष्य केले. (Maharashtra Politics news)
चंद्रकांत पाटील यांच्यासारखे व्यक्ती आमचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आहेत. आपण काय बोलतोय, जग कुठे चाललंय, याचा विचार करायला पाहिजे. आपण महाराष्ट्राचे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री आहोत. पण चंद्रकांत पाटील म्हणतात की, आंदोलनात जे दगड फेकण्यात आले आहेत, त्या दगडावरच्या फुटप्रिंटस आधारशी लिंक केल्या जाणार आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणतात. मला चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचे आहेत. कोल्हापूरकरांनी या माणसाला ज्ञान मिळावं म्हणून कोल्हापूरवरुन पुण्यात पाठवलं, जे शिक्षणाचं माहेरघर आहे, पण तिथेही यांचं काही झालं नाही. आता असे शिक्षणमंत्री म्हटल्यावर जेन झी पिढीचा पारा चढणार की नाही? ते म्हणत असतील की, अशी माणसं आमच्या नशिबी आणून ठेवलेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
पंतप्रधान मोदी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. त्यामध्ये ते म्हणतात की, जेन झी कडून माझ्याबाबत, माझ्या आईविषयी वापरण्यात आलेली भाषा अयोग्य आहे. मी पंतप्रधानांशी याबाबत सहमत आहे. कोणाबाबतही खालच्या थरातील भाषा वापरली जाऊ नये, 100 टक्के मान्य आहे पंतप्रधानांचं. पण मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की, ही गोष्ट तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा. महात्मा गांधी, नेहरु, इंदिरा गांधी यांच्यापासून आमच्यापर्यंत तुमची ट्रोलची टीम प्रत्येक राज्यात बसवली आहे, ते कोणत्या भाषेत बोलतात. महाराष्ट्रातील अनेक कलाकार आहेत, ते म्हणतात, खूप शिव्या पडतात, आम्ही बोलत नाही. अशा ट्रोलर्सनाही पंतप्रधान मोदी यांनी सांगावे. हे सगळं गेल्या 12 वर्षात सुरु झाले आहे, तुम्ही जे पेरलं तेच उगवलं आहे, तेच तुमच्या अंगावर आलं आहे. मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या, असे पंतप्रधान बोलतात, त्यांचा मुद्दा बरोबर आहे. पण पंतप्रधान मोदी यांनी हे त्यांच्या लोकांनाही सांगावे. दुसऱ्यांनाही आया असतात, हे हे तुमच्या पक्षातील लोकांना सांगा, असे राज ठाकरे यांनी म्हटले.