Param Bir Singh : परमबीर सिंह यांच्याविरोधात वसूलीसंदर्भात आणखी एक गुन्हा दाखल
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसूलीसंदर्भात गोरेगाव पोलिसात हा गुन्हा नोंद झाला आहे. काल रात्री हा गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या एफआयआरमध्ये परमबीर सिंह यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल , विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्या विरोधात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विमल अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्यानं हा गुन्हा नोंद केला असल्याची माहिती आहे.
विमल अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, जानेवारी-फेब्रुवारी 2020 ते मार्च 2021 दरम्यान आरोपींनी त्यांच्याकडून 9 लाख रुपयांची वसूली केली. अग्रवाल यांनी सांगितलंय की, त्यांच्या भागिदारी गोरेगावमध्ये BOHO रेस्टॉरेंट अँड बार आणि अंधेरीच्या ओशिवारामध्ये BCB रेस्टऑरेंट अँड बार आहे. हा बार चालवण्यासाठी सचिन वाझे आणि दुसऱ्या आरोपींनी 9 लाख रुपए आणि सॅमसंग कंपनीचा फोल्ड 2 मोबाईल हफ्ता म्हणून घेतला होता.























