NCB at Shahrukh Khan House : एनसीबीचं पथक शाहरुख खानच्या 'मन्नत'वर
Continues below advertisement
NCB at Shahrukh Khan Home : मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या 18 दिवसांपासून अटकेत आहे. अशात एनसीबीकडून याप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. अशातच आज एनसीबीच्या पथकानं शाहरुख खानच्या राहत्या घरी छापा टाकला, अशी माहिती मिळाली होती. परंतु, एनसीबीकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार, शाहरुख खानच्या मन्नतवर कोणताही छापा टाकण्यात आला नसून, काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एनसीबीचं पथक शाहरुख खानच्या घरी गेलं होतं.
Continues below advertisement