Navi Mumbai Airport Name Row : प्रकल्पग्रस्तांचा उद्या महामोर्चा; वाहतुकीत बदल

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐवजी प्रकल्पग्रस्त नेते दि बा पाटील यांचे नावे द्यावे यासाठी स्थानिक आगरी कोळी जनतेने लढा पुकारला आहे. उद्या 24 जुनला सिडको वर महामोर्चा निघणार असून यात 1 लाखाच्यावर आंदोलक सहभागी होतील, असा दावा नामकरण कृती समितीने केलाय. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबई पोलीसांनी शहरातील वाहतूक मार्गात बदल केले आहेत. जड वाहणांना 24 जुनला पुर्ण बंदी घालण्यात आली आहे. तर हालकी वाहणांचा मार्ग बदलला आहे. मुंबईवरून पुण्याला जाणारी आणि पुण्यावरून मुंबईत येणारी वाहणे वाशी , कोपरखैरणे , शिळफाटा, तळोजा या रस्त्याचा वापर करतील. नेरूळ , सिबीडी , खारघर या भागातील संपुर्ण रस्ते बंद करण्यात येणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola