Navi Mumbai International Airport ला दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी
निलेश बुधावले, एबीपी माझा
Updated at:
10 Jun 2021 05:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी आज स्थानिक भूमीपुत्रांनी आज ठिकठिकाणी मानवी साखळीचं आयोजन केलं आहे. यामध्ये नवी मुंबई, मुंबई, कल्याण डोंबिवली, कर्जत, भिवंडी, माथेरान याठिकाणी ही साखळी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची घोषणा केल्यानंतर आता हा वाद पेटला आहे. यामध्ये आता भाजपने देखील उडी घेत स्थानिक भूमिपुत्रांच्या मागणीला पाठींबा दिला आहे. आज मानवी साखळीचं आयोजन केल्यानंतर 24 जूनला हे बांधव सिडकोला घेराव घालणार असून मंत्रालयावर मोर्चा घेऊन जाणार आहेत. नवी मुंबई परिसरातुन आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी