Gangster Chhota Rajan | छोटा राजनला खंडणी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा

अंडरवर्ल्ड डॉन राजन निकाळजे उर्फ छोटा राजनला खंडणीच्या एका प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पनवेलमधील बांधकाम व्यायसायिक नंदू वजेकर यांच्याकडून 26 कोटींची खंडणी मागितल्याचं हे प्रकरण होतं. साल 2015 च्या या प्रकरणात छोटा राजनसह सुरेश शिंदे, लक्ष्मण निकम उर्फ 'दाद्या' आणि सुमित म्हात्रे या अन्य तीन जणांनाही दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. तर अन्य एका फरार आरोपीचा अद्याप शोध सुरू आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola