Mumbai Crime : दहिसरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, दुकानदाराचा मृत्यू; बंदुकीचा धाक दाखवत ज्वेलर्सची लूट
सत्यम सिंह
Updated at:
30 Jun 2021 02:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदहिसर पूर्व येथील गावडे नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून दिवसा ढवळ्या 3 जणांनी गोळी झाडून ज्वेलर्स मालकाचा खुन केला आहे. ओम साईराज ज्वेलर्स असं या ज्वेलर्स दुकानाचे नाव असून 3 अज्ञात व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून ओम साईराज ज्वेलर्स शिरले आणि त्यांनी दुकानात लूट केली. यावेळेस ज्वेलर्स चालकाने त्याला विरोध केला असता त्याच्यावर लुटारुने गोळी झाडली. यांत त्याचा जागीच मृत्यू झाला. दहिसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मुंबई पोलीसांचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे देखील घटना स्थळी पोहोचले आहे. या घटनेतील तिन्ही आरोपी फरार असून मुंबई पोलिसांनी सर्व मुंबई एन्ट्री पाॅईंटवर नाकाबंदी करण्याचे आदेश दिलेत.