Mumbai Air Pollution:वाढत्या प्रदूषणावर विधानसभेत प्रश्न,श्वसनाचे आजार वाढले असल्याची सरकारची कबुली
Continues below advertisement
Mumbai Air Pollution : मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर विधानसभेत प्रश्न,श्वसनाचे आजार वाढले असल्याची सरकारची कबुली
मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर विधानसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सरकारने, या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याची कबुली दिली. तसंच मुंबईत बीकेसीमधील प्रदूषणाचा स्तर सर्वाधिक असल्याची माहितीही आमदारांनी विचारलेल्या प्रश्नावर सरकारच्या वतीने देण्यात आली. मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मुंबईतील अन्य प्राधिकरणांसह महानगर क्षेत्रातील पालिकांना प्रतिबंधक उपाय करण्याच्या सूचना केल्या होत्या, मात्र त्याकडे सर्वाचंच दुर्लक्ष झालं. त्यामुळे मुंबईतील श्वसनाचे आजार वाढले असल्याची कबुली सरकारने दिली
Continues below advertisement