Kalyan Fraud : केडीएमसी 'ती' कारवाई संशयाच्या भोवऱ्यात, बिल्डर आणि अधिकाऱ्यांची CCTV मध्ये कैद

Continues below advertisement

Kalyan : अनधिकृत बांधकामासाठी बदनाम असलेली केडीएमसी अधिकृत बांधकाम प्रकरणी  पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.काही दिवसापूर्वी केडीएमसी कडून डीपी रस्त्यात येणाऱ्या सहा मजली बेकायदा इमारत जमीन दोस्त करण्यात आली होती. या इमारतीवर कारवाई न करण्यासाठी केडीएमसी अधिकाऱ्यांनी  लाखो रुपये उकळल्याचा आरोप बिल्डरने केला आहे. तर या प्रकरणाची गंभीर दखल घेत शहानिशा करत चौकशी करुन दोषींच्या विरोधात कारवाई केली जाईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. मात्र बेकायदा बांधकाम करणाऱ्या या बिल्डरसोबत एका हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांच्या सव्वा तास चाललेल्या या चर्चेचा सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानंतर  एकच खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram