
Ghatkopar Bhavesh Bhinde Absconded : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे फरार
मुंबई: घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. घाटकोपरच्या या दुर्घटनेनंतर (Ghatkoper Hoarding Accident) नेहमीप्रमाणे प्रशासकीय यंत्रणांनी एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडायला सुरुवात केली आहे. परंतु, या वादात आता भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी उडी घेत या दुर्घटनेप्रकरणी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. राम कदम यांनी उद्धव ठाकरे आणि भावेश भिंडे यांचा फोटो ट्विट केला आहे. भावेश भिडे (Bhavesh Bhide) हाच पेट्रोल पंपाचा मालक आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. भाजप नेते राम कदम आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiaya) यांनी या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
राम कदम यांनी भिडे आणि उद्धव ठाकरेंचा फोटो ट्विट करत म्हटले आहे की, 14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिंडे. श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात. हे मनाला चीड आणणारे चित्र आहे. त्या अनधिकृत होर्डिंगला कोणाचे संरक्षण होते, हे या चित्रावरून स्पष्ट होते. टक्केवारी सठी कोविड काळातले खिचडी चोर, कफनचोर... आजही टक्केवारी साठी 14 लोकांचे नाहक बळी घेत आहेत. कुठे फेडणार हे पाप?, असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
