Mumbai Cha Raja : 'मुंबईच्या राजा'चं फर्स्ट लूक! गणेशगल्लीच्या राजाचं दर्शन, मंडळाचं 94वं वर्ष
वेदांत नेब, एबीपी माझा
Updated at:
10 Sep 2021 01:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या राजाचं फर्स्ट लूक आज पाहायला मिळालं. यंदाच्या वर्षी लालबागचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच 'मुंबई चा राजा' चं हे 94 वर्षे आहे. दरवर्षी 22 फुटपर्यत असणारी गणेशमूर्ती यावर्षी कोरोना निर्बंधांमुळे मूर्तीची उंची ही चार फुटाची आहे. मूर्ती जरी चार फुटाची असली तरी सर्व निर्बंध पाळून यावर्षीचा गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जाणार आहे. खास या गणेशोत्सवासाठी मुंबई चा राजा मंडपात पूर्णपणे फुलांची आरास करून सजावट केली आहे.