CNG Price in Mumbai : महागाईचे चटके सोसणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा; सीएनजीच्या दरात मोठी कपात
abp majha web team
Updated at:
31 Jan 2023 09:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई आणि आसपासच्या शहरात आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून सीएनजीच्या किंमतीत कपात करण्यात येणार आहे. सध्या एक किलो सीएनजीचा भाव ८९ रुपये ५० पैसे आहे. पण आज मध्यरात्री पासून एक किलो सीएनजी अडीच रुपयांनी स्वस्त होणार आहे. एक किलो सीएनजीला आता ८७ रुपयांचा दर द्यावा लागणार आहे. त्यामुळं रिक्षाचालक आणि सीएनजीवर चालणाऱ्या सार्वजनिक आणि खासगी वाहनांना फायदा होणार आहे.