Dahisar : रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक, रेल्वेचं बनावट लेटरहेड जप्त
रेल्वेत नोकरी देण्याच्या नावाखाली शेकडो सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणांना लाखोंचा चुना लावणाऱ्या आरोपीला दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. त्याचं नाव जितेंद्र यशवंत घाडी असं असून, त्याला कांदिवलीच्या एकतानगरमधून अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडून रेल्वेचं बनावट लेटरहेड आणि जॉइनिंग लेटरच्या प्रती जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी आरोपीच्या आणखी एका साथीदारालाही अटक करण्यात आली आहे. आपण रेल्वेतील बडे अधिकारी असल्याचं भासवून नोकरी देण्याच्या आमिषानं आरोपी बेरोजगार तरुणांकडून तीस हजारापासून 85 हजारांपर्यंतची रक्कम घेत होता.
Tags :
Job Railway Arrested Unemployed Dahisar Police Educated Jitendra Yashwant Ghadi Letterhead Joining Letter Copies Seized