ABP News

Ashish Shelar : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेश मूर्तींवर बंदी घालू नका

Continues below advertisement

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेशमूर्तींवर बंदी घालू नका अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलारांनी मुंबई महापालिकेकडे केली आहे. राज्य सरकारच्या तांत्रिक समितीचा अहवाल येईपर्यंत मुंबई महापालिकेनेनं वाट पाहावी असंही शेलारांचं म्हणणं आहे. पीओपी मूर्ती बनवण्याच्या व्यवसायावर अनेक कुटुंबं अवलंबून असतात. त्यामुळं राज्य सरकारनं नेमलेल्या तांत्रिक समितीचा अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत पीओपीच्या मूर्तीवर सरसकट बंदी घालणं अयोग्य आहे अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. दरम्यान, पीओपीच्या मूर्तींसंदर्भात परवानगी देता येईल का, याबाबत आम्ही चर्चा करणार आहोत, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram