Aryan Khan Drugs Case : किरण गोसावींना पकडण्यासाठी पुणे पोलीस उत्तर प्रदेशमध्ये जाणार : Kiran Gosavi
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Cruise Case : मुंबईतील क्रूझवरील अंमली पदार्थ पार्टी प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. पंच प्रभाकर साईल यांच्या गौप्यस्फोटानंतर या प्रकरणातील दुसरे पंच आणि साधीदार किरण गोसावी याची अटक अटळ आहे. पुणे पोलिसांचं पथक गोसावीला अटक करण्यासाठी लखनौला रवाना झालं आहे. गोसावीवर आतापर्यंत चार गुन्हे दाखल आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांच्या तापासासाठी पोलीस त्याचा शोध घेत आहे. फसवणूकप्रकरणी गोसावीविरोधात पुणे पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे. सोमवारी सायंकाळी गोसावी याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये तो सरेंडर करण्यासाठी लखनौ पोलिसांकडे गेला समजत होतं. मात्र लखनौ पोलिसांनी गोसावीला अटक करुन घेण्यास नकार दिल्याच समजतेय. इतर ठिकाणी सरेंडर होण्याचा सल्ला लखनऊ लखनऊ पोलिसांनी दिला. गोसावी लखनौमध्ये आहे, हे समजताच पुणे पोलिसांचं पथक रवाना झालं आहे. त्यामुळे आता गोसावीची अटक निश्चित मानली जात आहे.