Mumbai : कुलगुरूंची नियुक्ती राज्य सरकारकडूनच, नव्या कायद्याविरोधात ABVPचं आंदोलन
Continues below advertisement
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 मध्ये बदल करून राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारकडून शिफारस केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयाला मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. कुलपतींच्या अधिकार कमी करून राज्य सरकार विद्यापीठांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढविण्याचा डाव राज्य सरकारचा असल्याचा आरोप अभाविप ने केला असून याविरोधात आज विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये अभाविप कडून आंदोलन केले जात आहे. शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढविण्याच्या निर्णयाला मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही अभाविपने दिला आहे.
Continues below advertisement