Exclusive on Aarey Colony : मुंबईच्या आरे कॉलनीतील मानव-वन्यजीव संघर्ष! काय आहेत कारणं?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमागील दोन महिन्यात दोन बिबट्यांच्या पिल्लांकडून आरेमध्ये हल्ले झाल्याची वनविभागाची माहिती दिली आहे. दोन ते अडीच वर्ष दोघांचं ही वय असल्याची माहिती सहाय्यक वन संरक्षक गिरीजा देसाई-पाटील यांनी दिली आहे. सोबतच एक बिबट्याला आधीच वन विभागाकडून ताब्यात घेण्यात आलं आहे तर दुसऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहे. आरे परिसर हा संजय गांधी नॅशनल पार्कला लागून असल्याने या परिसरात देखील ते आढळून येतात. आरे सारख्या मानवी वस्ती असलेल्या भागात मानव-वन्यजीव संघर्ष कमी व्हावा यासाठी वनविभागाकडून अनेक उपाययोजना, जनजागृती मोहीम एनजीओच्या मार्फत करण्यात येत आहे. आरेतील नागरिक हे बिबट्याच्या सहवासात राहात असतात, अशावेळी नागरिकांकडून देखील काही खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं गिरीजा देसाई पाटील म्हणाल्यात.