MRI City scan News : गेल्या 3 आठवड्यांपासून MRI, CT स्कॅन, एक्स रे सेंटर्स बंद
MRI City scan News : गेल्या 3 आठवड्यांपासून MRI, CT स्कॅन, एक्स रे सेंटर्स बंद
राज्यातील सर्व जिल्हा, उपजिल्हा रूग्णालयातील एमआरआय, सीटी स्कॅन, एक्स रे केंद्र तीन आठवड्यांपासून बंद पडली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. सरकारी रूग्णालयातील यंत्र बंद पडल्याने सामान्यांना अधिकचे पैसे मोजून खासगी सेंटर्समधून ही तपासणी करून घ्यावी लागत आहे. त्याचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. ही सेवा देण्याचं काम सरकारने कृष्णा डायग्नोस्टिक या खासगी कंपनीला दिलंय. मात्र या कंपनीचे गेल्या तीन महिन्यांपासून सरकारकडे ४३ कोटी थकलेले आहेत. त्यामुळे आता कंपनीने सेवा ठप्प केलीय. सरकारने हा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवल्याने अनेकदा कंपनीची देयके थकवली जातात, त्यामुळे संपूर्ण सेवेवर परिणाम होतो असं कंपनीच्या एका अधिकाऱ्याने म्हटलंय.
Tags :
Government Hospital Prakash Abitkar Buldhana Hospital ABP Majha #Marathi News MRI City Scan News