Yogesh Kadam : गैरप्रकार केला नाही,गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांची शिंदेंकडे धाव
Continues below advertisement
गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्याने शस्त्र परवाना (Arms License) वादाला नवं वळण मिळालं आहे. गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन धायवाडला (Sachin Dhaywad) दिलेल्या शस्त्र परवान्यावरून कदम अडचणीत आले आहेत. 'कुठल्याही गैरप्रकारे परवान्याबाबत विशेष अधिकार वापरले नाही,' असं स्पष्टीकरण योगेश कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं. शिंदे यांच्या मुक्तागिरी या निवासस्थानी झालेल्या भेटीत कदमांनी आपली बाजू मांडली. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन धायवाडला शस्त्र परवाना दिल्याचा आरोप कदमांवर आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांना पूर्ण पाठिंबा असल्याचा निर्वाळा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणामुळे विरोधक आक्रमक झाले असून कदमांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement